पारंपरिक उद्योगघराण्याला सुमारेपावणेपाच लाख कोटी रुपयांच्या जागतिक कीर्तीच्या उद्योगसमूहात परावर्तित करणारेरतन नवल टाटा शुक्रवारी आपल्या ७५ व्या वाढदिवशी टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत आहेत. तब्बल २१ वर्षे त्यांनी समर्थपणे सांभाळलेल्या या उद्योगसमूहाची धुरा त्यांचे वारसदार सायरस मिस्त्री विधीवत सांभाळणार आहेत.
गत २१ वर्षांच्या कालावधीत अनेक वादळे लीलया शमवत, जगभरातील उद्योगधुरीणांचे डोळे विस्फारतील अशा कंपन्यांचे संपादन करीत टाटा समूहाला विजिगीषू चेहरा प्रदान करणारे रतन टाटा यांची ५० वर्षांची उद्यमी कारकीर्दीलाही यातून विराम मिळणार आहे. टाटा उद्योगसमूहाची सर्वपालक कंपनी 'टाटा सन्स'मध्ये सर्वाधिक १८ टक्क्यांची हिस्सेदारी असलेल्या शापूरजी पालनजी समूहाचे सायरस मिस्त्री यांची गेल्या वर्षीच पाच सदस्यांच्या निवड समितीने रतन टाटांचे वारसदार म्हणून निवड केली होती. नोव्हेंबर २०११ मध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले मिस्त्री यांना गेले वर्षभर रतन टाटा यांनी साथ देऊन, या आपल्या वारसदारासाठी गुरू व मार्गदर्शकाचीही भूमिका निभावली.
आजच्या घडीला भारतातच नव्हे तर जगातील एक सर्वात आदरणीय आणि प्रभावशाली उद्योगधुरीण म्हणून ओळख निर्माण करणारे रतन टाटा यांनी निवृत्तीनंतर टाटा समूहाचे मानद अध्यक्षपद स्वीकारले आहे. परंतु मुख्यत: टाटा सन्सची ६६ टक्के मालकी असलेल्या विविध विश्वस्त संस्थांचे प्रमुख ते जबाबदारी वाहतील आणि या विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले धर्मादाय व सामाजिक कार्य हे यथासांग सुरू राहील, यासाठी उद्योगसमूहाकडून लाभांशरूपाने चांगला परतावा मिळत राहतील याची एक भागधारक या नात्याने काळजी वाहणे हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय राहील, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शापूरजी पालनजी मिस्त्री यांचे सायरस हे धाकटे पुत्र होय. सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत. मिस्त्री यांची एक बहिण रतन टाटा यांचे सावत्र बंधू नवल यांची पत्नी आहे. मिस्त्री यांचे वारसदार म्हणून नाव निश्चित होण्याच्या आधीच नवल यांच्यावर समूहाच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने तेच टाटांचे वारसदार असतील अशी चर्चा होती.
रतन टाटा यांनी १९६२ मध्ये समूहात पाऊल ठेवले. १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. १९८१ मध्ये ते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनले. येथेच समूहात धोरणे राबविणे, उच्च तंत्रज्ञान व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे आदींवर त्यांनी भर दिला. कॉर्नवेलमधून १९६२ मध्ये स्थापत्य पदवीप्राप्त असलेले टाटा यांनी त्यावेळी लॉस एंजल्सच्या 'जॉन्स अॅण्ड एम्मन्स'मध्येही त्यांनी काम केले. १९७५ मध्ये त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.
रतन टाटा यांच्या प्रभावशाली नेतृत्त्वाची २१ वर्षे
१९९१ * जेआरडींच्या वारसदाराच्या रूपात टाटा समूहात अध्यक्षपदी नियुक्ती.
१९९६ * टाटा टेलीसव्र्हिसेसच्या स्थापनेतून दूरसंचार क्षेत्रात टाटा समूहाचे पदार्पण
१९९८ * 'टाटा इंडिका' या संपूर्ण स्वदेशी रचना व घडणी असलेल्या कारसह टाटा मोटर्सचा प्रवासी वाहन क्षेत्रात प्रवेश
१९९९ * टाटा समूहाच्या नव्या ओळखीचा प्रत्यय देणाऱ्या बोधचिन्हाचे अनावरण
२००० * टाटा टी (सध्याची टाटा ग्लोबल बेव्हरेजेस) या कंपनीचा ब्रिटनच्या टेटले समूहावर ताबा. कोणत्याही भारतीय कंपनी विदेशात केलेले पहिले अधिग्रहण
२००१ * अमेरिकेतील एआयजी समूहाबरोबर भागीदारीतून 'टाटा-एआयजी' ही संयुक्त कंपनी
* टीसीएसद्वारे 'सीएमसी' या कंपनीचे संपादन
२००३ * वार्षिक महसूलात १ अब्ज डॉलरचा आकडा गाठणारी टीसीएस ही देशातील पहिली सॉफ्टवेअर कंपनी बनली
* टाटा टेलीसव्र्हिसेसकडून 'टाटा इंडिकॉम' ही मोबाईल सेवा मुंबईत दाखल
* मुंबईतील ताज महल पॅलेस हॉटेलचा शतकमहोत्सव
२००४ टाटा मोटर्स ही समूहातील टाटा कम्युनिकेशन्स (पूर्वाश्रमीची व्हीएसएनएल)नंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध होणारी दुसरी कंपनी बनली
* दक्षिण कोरियातील जड वाहन निर्मात्या डेवू मोटर्सवर टाटा मोटर्सचा ताबा
* तब्बल १.२ अब्ज डॉलरचा निधी उभारणारी देशातील खासगी कंपनीची पहिली सर्वात मोठी भागविक्री टीसीएसने यशस्वीरित्या राबविली
२००५ * टाटा स्टीलने सिंगापूरस्थित नॅटस्टील संपादित केली
* टाटा कम्युनिकेशन्स (तत्कालीन व्हीएसएनएल) टायको ग्लोबलचा ताबा मिळवून समुद्राखालील केबल बँडविड्थचे जाळे असलेली जगातील सर्वात मोठी कंपनी बनली
* ताज समूहाने न्यूयॉर्कच्या 'पिएरे'चे व्यवस्थापन हक्क मिळविले
२००६ 'टाटा स्काय' या उपग्रहाधारीत प्रक्षेपण सेवेचा देशव्यापी विस्तार
* ताज समूहाचा बोस्टनस्थित 'रिट्झ-कार्लटन'वर ताबा
* ब्रिटनच्या ब्रुनेर माँड समूहावर टाटा केमिकल्सची मालकी
२००७ टाटा स्टीलकडून जगातील पाचवी मोठी पोलाद उत्पादक असलेली अँग्लो-डच कंपनी 'कोरस'वर ताबा
* टीसीएसची चिनी सरकारच्या भागीदारीतून 'टीसीएस चायना' संयुक्त कंपनी कार्यान्वित
* जगातील वेगवान महासंगणक 'एका'चा विकास
* ताज समूहाकडून अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये 'कॅम्प्टन पॅलेस हॉटेल'चे अधिग्रहण
* वित्तीय क्षेत्रात 'टाटा कॅपिटल' या नव्या कंपनीची स्थापना
२००८ 'टाटा नॅनो' या छोटेखानी कारचे अनावरण.
* टाटा मोटर्सकडून ब्रिटनचा जग्वार लॅण्ड रोव्हर या आलिशान वाहन ब्रॅण्डची खरेदी.
* टाटा केमिकल्समार्फत अमेरिकेतील जनरल केमिकल इंडस्ट्रीज प्रॉडक्ट्स कंपनी ताब्यात.
* रतन टाटा 'पद्म विभूषण'ने सन्मानित.
* २६ नोव्हेंबरला दहशतवादी हल्ल्यात ऐतिहासिक ताज हॉटेलचे जबर नुकसान
२००९ एनटीटी डोकोमोसह टाटा टेलीसव्र्हिसेसची देशव्यापी 'जीएसएम' मोबाईल सेवा
* 'टाटा स्वच्छ' या किफायती वॉटर प्युरिफायरचे टाटा केमिकल्सकडून अनावरण
* टाटा हाऊसिंगकडून बोईसरनजीक परवडणाऱ्या गृहप्रकल्पाची घोषणा
२०१० * टाटा केमिकल्सचा 'ब्रिटिश सॉल्ट'वर ताबा
२०११ * टाटा नॅनो देशाबाहेर श्रीलंका, नेपाळमध्ये दाखल
२०१२ * टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचे जागतिक ख्यातीच्या 'स्टारबक्स'बरोबर कॉफी दालने थाटण्यासाठी भागीदारी
* 'ओरिएन्ट एक्स्प्रेस' या ऐषारामी जागतिक हॉटेल शृंखलेवर ताब्यासाठी बोली दाखल
नेतृत्वाचा वारसा..
जमशेदजी नसरवानजी टाटा
संस्थापक
जन्म: ३ मार्च १८३९; मृत्यू : १९ मे १९०४
जेआरडी - १९३८ ते १९९१
जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा
जन्म: २९ जुलै १९०४;
मृत्यू : २९ नोव्हेंबर १९९३
१९९१ ते २०१२
रतन नवल टाटा
जन्म: २८ डिसेंबर १९३७
२०१३ सहावे अध्यक्ष
सायरस पालनजी मिस्त्री
जन्म: ४ जुलै १९६८
publisher - loksatta
http://www.loksatta.com/arthasatta-news/cyrus-mistry-to-take-over-tata-empire-33605/

0 comments:
Post a Comment